भारत मुक्ती मोर्चाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी तानाजी बोकेफोडे यांची निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वीर बिरसा मुंडा व राष्ट्रपिता लहुजी वस्ताद यांच्या जयंती निमित्त बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी करमाळा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात बामसेफचे राष्ट्रीय महासचिव, नवी दिल्ली येथील गोरखनाथ वेताळ सर यांच्या हस्ते तानाजीराव बोकेफोडे (बार्शी) यांची भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या गोरखनाथ वेताळ सर यांच्या हस्ते तानाजी बोकेफोडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.




