शिवसेनाप्रमुख, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज वॉलचंद कॉलेज रोड येथील सोलापूर जिल्हा शिवसेना कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. अजय दासरी, काँग्रेस शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
शिवसेना शहर प्रमुख नाना मोरे, यावेळी तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, दत्ता गणेशकर, प्रताप चव्हाण, अमिता जगदाळे, अंबादास चव्हाण, चंद्रकांत मानवी, संताजी भोळे, शशिकांत बिराजदार, अजय खांडेकर, जगदीश कलेकरी, पंकज गजाकोश, सुधीर संगेपाग, इस्माईल मकानदार, सिकंदर नदाफ, महिबुब पठाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.




