बार्शीमहाराष्ट्र

गोव्यातील आयर्नमॅन स्पर्धेत बार्शीच्या माणिक हजारे यांचा नवा विक्रम , अमोल ताकभाते, प्रकाश फुरडे, डॉ. नवदीप लोकरे यांनी बार्शीचा अभिमान उंचावला

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : गोवा येथे 9 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या जागतिक आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत बार्शीचे माणिक हजारे यांनी अभुतपूर्व कामगिरी करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 30 देशांतील सुमारे 1600 स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेला जगातील सर्वात कठीण ट्रायथलॉन स्पर्धांपैकी एक मानले जाते. 1.9 कि.मी. पोहणे, 90 कि.मी. सायकल चालवणे आणि 21.1 कि.मी. धावणे हे तिन्ही टप्पे एकूण 8 तास 30 मिनिटांत पूर्ण करण्याचे आव्हान असते. या आव्हानात्मक स्पर्धेत बार्शीतील माणिक हजारे, अमोल ताकभाते, प्रकाश फुरडे आणि डॉ. नवदीप लोकरे यांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेत माणिक हजारे यांनी जबरदस्त जिद्दीच्या जोरावर संपूर्ण ट्रायथलॉन अवघ्या 7 तास 18 मिनिटे 12 सेकंदात पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या या विक्रमी प्रदर्शनामुळे जागतिक स्तरावर बार्शी तालुक्याचे नाव अभिमानाने झळकले असून, त्यांच्या मेहनत आणि चिकाटीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या यशामागे सहकारी रंजीत (मामा) पाटील, अजित मिरगणे, बाळराजे पिंगळे, बाळासाहेब ढेंबरे, रवी बजाज हनुमंत काळेल आणि दत्ता मोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रेरणेनेच माणिक हजारे यांनी हा कठीण टप्पा अधिक उर्जेने पार केला.

माणिक हजारे यांची ही कामगिरी बार्शीतील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, स्थानिक क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करणारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button