येसगाव–टाकळी परिसरातील नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाला यश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहिल्यानगर, दि. १६ : येसगाव व कोपरगाव परिसरात ५ आणि १० नोव्हेंबर रोजी दोन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या परिस्थितीत प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्या आदेशानुसार वन विभागाच्या पथकाने १४ नोव्हेंबर रोजी टाकळी सोनारीजवळ नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त केला.

दोन सलग घटनांनंतर नागरिकांनी अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर रास्ता रोको केला होता. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वन विभागाने शोधमोहीम राबवून बिबट्याचा मागोवा घेतला. टाकळी आश्रमशाळेमागील परिसरात उपस्थिती आढळताच कोपरगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने शार्पशूटर टीमसह तत्काळ कारवाई करून रात्री ९.४५ वाजता बिबट्याचा बंदोबस्त केला. अंदाजे पाच ते सहा वर्षांचा नर बिबट मृत अवस्थेत मिळून शवविच्छेदनासाठी बारागाव नांदूर रोपवाटिकेत हलविण्यात आला.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक नाशिक (प्रा) मल्लिकार्जुन आणि उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे, सुनील साळुंके, सागर केदार, सुभाष सांगळे, वाघूलकर, शार्पशूटर राजीव शिंदे व टीम, तसेच रेस्क्यू अँड एनिमल सपोर्ट टीम नाशिक–पुणे यांच्या सहकार्याने पार पडली. कोपरगाव, राहुरी, संगमनेर वनपरिक्षेत्र आणि फिरते पथक अहिल्यानगर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या