जनतेतून झाला आग्रह… म्हणून सुशांत चव्हाण निवडणुकीच्या मैदानात…..
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री शिवछत्रपती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संचालित युवा प्रतिष्ठाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मागील 20 वर्षा पासून कार्य करणारे युवा नेतृत्व adv सुशांत चव्हाण यांच्या उमेदवारी साठी पक्ष नेतृव व जनतेतून आग्रही मागणी झाल्याने कायम पडद्या आड राहून काम करणारा कार्यकर्ता अखेर निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
सुशांत चव्हाण यांनी आज पर्यंत कोणतेही पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक वर्षी शिव जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून सुमारे 2500 पेक्षा जास्त संकलन केले आहे. प्रत्येक वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव, दहीहंडी उत्सव त्याच बरोबर इतर महापुरुषांच्या जयंती साजऱ्या केल्या.
दुष्काळात 31 डिसेंबर सारखा पश्चत्य उत्सव साजरा न करता मुख्यमंत्री सहायता निधीत मदत केली. नैसर्गिक आपत्ती मध्ये केवळ घरात न बसता परिसरातील लोकांना स्वतः व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मदत केली. कोरोना सारख्या संकटात परिसरातील गरीब कुटुंब व लोकांची माहिती घेऊन शक्यती मदत त्यांना केली.
मागील 20 वर्षा पासून जनतेत राहून काम करूनही त्यांनी कधीच डिजिटल बाजी व चमको गिरी ला कधी थारा दिला नाही. त्या मुळे इतर चौका चौकात दिसणाऱ्या डिजिटल प्रमाणे कधीही त्यांनी स्वतःचा व जवळच्या लोकांचा डिजिटल लावला नाही.
सामाजिक बांधिलकी जपून आपण केलेले काम च आपला चेहरा आहे. त्यामुळे डिजिटल वर चेहरा दाखवण्याची गरज नाही असा त्यांचा विचार आहे. स्वतः कायद्याची पदवी घेतली घरात ऍड बी एन दादा चव्हाण यांचा वकिली क्षेत्राचा मोठा वारसा असतानाही केवळ काही लोकांची वकिली करण्यापेक्षा समाजाची वकिली महत्वाची असून त्यांचे प्रश्न सोडवण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे.
त्यांच्या या स्वभाव मुळेच सर्वच जाती धर्मातील पक्षातील लोक त्यांच्या वालयात आलेत. इतके दिवस सामाजिक काम करताना त्यांनी कधीही कोणत्या नेता किंवा लोकांकडून आर्थिक मदत घेतली नाही. उलट वेळ प्रसंगी त्यांनी स्वतःच्या खिश्यातून आर्थिक मदत केली पण त्याचा गाजावाजा होऊ दिला नाही. ग्राउंड लेव्हलला एक कार्यकर्ता म्हणून झटत असताना त्यांनी कधी ही मान पान उमेदवारी पद प्रतिष्ठा याची अपेक्षा केली नाही. शेवटी लोकांमधून अग्रही मागणी झाल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांना उमेदवारी दिली आहे.
बार्शी शहरातील सर्वात सुशिक्षित आशा प्रभाग क्र 18 मधून त्यांची उमेदवारी निश्चित झाली असून जनता मागील 20 वर्षा पासून त्यांनी केलेल्या कार्याची दखल नक्कीच घेईल व त्यांना बार्शी नगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून पाठवेल हा विश्वास आहे. बदलत्या कळात उमेदवारी पण बदलत आहे. घराणे शाहीला फाटा देऊन एका हाडाच्या कार्यकर्त्याला दिलेली उमेदवारी नक्कीच बदल घडवून आणणारी ठरेल.




