सुट्टीच्या दिवशीही निवडणूक नामनिर्देशन स्वीकारणार; १६ नोव्हेंबरला अर्ज दाखल करता येणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम, दि. १५ नोव्हेंबर : जिल्ह्यातील ४ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाले आहेत.
सदर कार्यक्रमानुसार रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्देशित केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार १६ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र स्वीकारणे बंधनकारक राहणार असून, संबंधितांनी अर्ज दाखल करावेत. तरी सर्व उमेदवार व संबंधित यंत्रणांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.




