महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पुर्वतयारी चा आढावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे घेतला. येत्या 6 डिसेंबर 2025 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो भीम अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा; सुरक्षा ;आरोग्य; स्वच्छता आदी कामाच्या पूर्वतयारीचा आढावा घेणारी बैठक न. रामदास आठवले यांनी घेतली.
यावेळी जिल्हा अधिकारी आचल गोयल; बार्टीचे महासंचालक सुनील वारे; राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विश्वनाथ इंदिसे; मुंबई मनपा चे सपकाळ; एम एम आर डी ए; रेल्वे; पोलिस आदी विभागांचे अधिकारी;पूज्य बौद्ध भदंत डॉ राहुल बोधी महाथेरो आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे असणारा स्तूप जीर्ण झाला असून त्या ठिकाणी दीक्षाभूमी सारखा भव्य स्तूप उभारला पाहिजे. मुंबईतील विधानभवन च्या धर्तीवर चैत्यभूमी चा स्तूप आणि पाठीमागे चैत्यभूमी ची इमारत उभारून विकास केला पाहिजे.चैत्यभूमी जवळच्या सेल्फी पॉईंटपासून इंदुमिलपर्यंत समुद्रातून रस्ता बनवला पाहिजे आदी सूचना ना.रामदास आठवले यांनी केल्या.
चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना भोजनदान करण्यात येणार आहे. किमान 1 लाख अनुयायांना भोजनदान करण्यात येणार आहे. महापरिनिर्वाण दिनी पावसाची शक्यता असल्यास अपतिव्यवस्थपन ची यंत्रणा तयार ठेवण्याबाबत चर्चा झाली. अनुयायांना सुरक्षा पुरविणे अन्नदान आरोग्य आदी सुविधा आणि ट्रॅफिक रेल्वे पुरविण्याबाबत आदी कामांच्या पूर्वततयारीचा आढावा na. रामदास आठवले यांनी घेतला. यावेळी अनेक रिपाइं चे नेते उपस्थित होते.




