राज्यसेवा परीक्षेत विजय लामकाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विजय लामकाने यांचा पराक्रम; जिद्द, मेहनत आणि चिकाटीने मिळवला राज्यातील पहिला क्रमांक
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा डंका पुन्हा एकदा राज्यभर वाजला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र विजय लामकाने यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे.
त्यांच्या या विलक्षण यशामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विजय लामकने यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांचा हा यशप्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. समस्त सोलापूरकरांना विजय यांचा अभिमान वाटत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.




