वळसंग पोलिसांची मोठी कारवाई , तिल्ल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारूवर छापा

0

Oplus_16908288

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत मौजे तिल्ल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, तसेच पोलीस हवालदार श्रीशैल माळी, सुनील कुवर, अशोक पाटील, दर्याप्पा व्हाणमोरी आणि संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला. छाप्यात एकूण १,४०० लिटर गुळमिश्रित रसायन आणि बॅरलसह ₹५०,४०० किमतीचा मुद्देमाल, तसेच ७० लिटर तयार हातभट्टी दारू (किंमत अंदाजे ₹७,०००) जप्त करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या