एम.डी. अंमली पदार्थ विक्रीत आरोपी अटक , शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका मोठ्या कारवाईत ३६ ग्रॅम Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करून, किंमत अंदाजे ₹१,०८,०००/- इतका मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलीस आयुक्त एम. राज कुमार, उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेचे अधिकारी शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात सतत कारवाई करत आहेत.
गुप्त माहितीनुसार, सोलापूर एस.टी. स्टँड परिसरात संशयित इसम विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोहमद अझहर हैदरसाहेव कुरेशी (वय ३७, रा. पुणे) यास अटक केली. त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची एम.डी. पावडर जप्त करण्यात आली असून, प्राथमिक रासायनिक तपासणीत ती Mephedrone असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपीने हा अंमली पदार्थ मुंबई येथून सोलापूरमध्ये विक्रीसाठी आणल्याचे चौकशीत उघड झाले आहे. प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे करीत आहेत.
ही कारवाई अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली ग्रे.पो.स.ई. शामकांत जाधव व त्यांच्या पथकातील बापू साठे, सैपन सय्यद, वसिम शेख, सुभाष मुंढे, अनिल जाधव, कुमार शेळके, मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली.




