इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ.रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव मगर हे मंत्रालयातून तर पुणे विभागीय अतिरिक आयुक्त डॉ.स्वाती देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नितीन पाटील हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्यव्यवसाय विकासावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या तसेच इंदापूरपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या उजनी धरणाची साठवण क्षमता अंदाजे ११७ टीएमसी इतकी आहे. उजनी धरणाचे बॅकवॉटर सुमारे ७०-८० किलोमीटर पर्यंत असून या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. येथे गोड्या पाण्यातील निर्यात करण्यायोग्य मासे उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी महाविद्यालय झाल्यास तेथील मत्स्यबीज संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देणे शक्य होईल तसेच इंदापूर, बारामती, दौंड,पुरंदर या भागात मोठ्या प्रमाणात शेततळे असल्याने याचा उपयोग शेतकऱ्यांना मत्स्यपालन शेतीसाठी करता येईल.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या