ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे निधन
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : भारतीय सिने आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सतीश शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दूरचित्रवाणीवरील ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेत ‘इंद्रवदन साराभाई’ या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते.
याशिवाय ‘जाने भी दो यारों’, ‘मैं हूं ना’, ‘कल हो ना हो’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या.




