सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाचा सामाजिक उपक्रम, माणुसकीचा दिवा पेटवणारे कार्य…
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्यानंतर पूराने अनेकांचे संसार वाहून गेले, घरं उद्ध्वस्त झाली, हसरे चेहरे दु:खाने भरले…पण या काळोखातही बार्शीतील सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाने माणुसकीचा दिवा पेटवणारे कार्य…
सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका सौ दिपाली गोरे मॅडम यांच्या संकल्पनेतून सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर बार्शी व पालक यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी तालुक्यातील मांडेगाव येथे पूरग्रस्त कुटुंबांना तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना शिधास्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत केली…
मदत खालील प्रमाणे पूरग्रस्त कुटुंबासाठी दिवाळीसाठी लागणारे साहित्य गरा, मैदा, साखर, तेल, तांदूळ, गहू, दाळी, चुरमुरे, साबण व साडी, टाॅवेल तसेच आकाश दिवे
अंगणवाडीतील लहान मुला मुलींना ड्रेस, शालेय साहित्य ही मदत म्हणून पुरवले या ठिकाणी प्रमुख उपस्थिती सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका सौ दिपाली गोरे मॅडम पालक प्रतिनिधी अभिषेक पंपट तसेच मांडेगावचे उपसरपंच सतीश मिरगणे ग्रामसेवक इंगळे पोलीस पाटील राहुल बंडू रोजगार सेवक उमेश मिरगणे ग्रामपंचायत सदस्य बबन मिरगणे सुरेश पायघन जीवन दळवी या सर्वांचे ग्रामस्थांनी आभार मानले व सूत्रसंचालन गजानन दळवी यांनी केले.
बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका व सर्व स्टाफ ने पालक वर्गांनी दाखवलेला हा उपक्रम म्हणजे समाजसेवेचा नव्हे, तर हृदयातील करुणेचा खरा अर्थ आहे. असे सामाजिक उपक्रम बालक मंदिर विभागाच्या वतीने सतत राबवले गेले आहेत.”
यावेळी बालक मंदिर विभागाच्या दिपाली कळसकर मॅडम, पूनम वासकर मॅडम, भारती चोपडे मॅडम, तेजश्री स्वामी मॅडम,लखन जाधव आणि मंगळवेढेकर मावशी यांनी परिश्रम घेतले.




