आयटक डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघटनेने पूरग्रस्तांसाठी शासनास दिले 35 हजार रुपये
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आयटक संलग्न डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ बार्शी यांच्या वतीने कामगारांनी जमा केलेले पस्तीस हजार रुपये पूरग्रस्तांसाठी शासनाचे प्रतिनिधी मा. तहसीलदार एफ. आर. शेख यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे व कार्याध्यक्ष लहू आगलावे यांनी चेकद्वारे सुपूर्द करण्यात आले. यावेळी मंचावर पोलीस अधिकारी अभय माकणे, हॉस्पिटल सुप्रीडेन्ट डॉ. रामचंद्र जगताप हे उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार यांनी कामगारांनी जमा केलेल्या रकमेचे कौतुक केले. त्यासोबतच हॉस्पिटल सुप्रीडेन्ट डॉ. जगताप यांनी “दिली गेलेली रक्कम हि कामगारांनी आपल्या हृदयापासून दिली आहे” असे म्हणत कामगारांच्या या कृतीचे कौतुक केले.
यावेळी कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले “आयटक देशातील पहिले कामगार संघटन आहे, आम्ही कामगारांचे लढे आंदोलने, वैचारिक कार्यक्रम तर करतोच परंतु कामगाराचा एक सुजन संवेदनशील नागरिक तयार या हेतूने देखील यापूर्वी आम्ही शासनाला अशा स्वरूपाची मदत केली आहे व आता देखील शेतकऱ्यांच्या अडचणीला आम्ही धावून आलो आहोत. माढा- अक्कलकोट या ठिकाणी प्रत्यक्ष आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने साहित्य वाटप केले आहे; बार्शी मध्ये आम्ही हा निधी जमा करून शासनास देत आहोत.”
यावेळी प्रा. राजन गोरे, आनंद गुरव, तानाजी बागल, भारती मस्तुद , संपत खताळ, सुनील ढगे, अमित यादव, जमीला शेख , आयटकचे जिल्हा सचिव कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रवीण मस्तुद , अनिरुद्ध नखाते आदी उपस्थित होते.




