खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे कीटचे वाटप

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे मोहोळ तालुक्यातील अनेक गावांतील कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात “एक लोकप्रतिनिधी म्हणून संकटात सापडलेल्या माझ्या बांधवांसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करणे ही माझी जबाबदारी आहे,” अशा भावनेतून सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पूरग्रस्त कुटुंबांसाठी जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वितरण केले.

मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक, विरवडे खुर्द, भोयरे, वडवळ, या गावांमध्ये तसेच हिंगणी निपाणी येथील पांडुरंग गडदे वस्ती येथील पूरग्रस्त नागरिकांना ही मदत पोहोचविण्यात आली. अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळावा, या उद्देशाने खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप पाटील, युवराज दत्तू चव्हाण, महादेव खोचरे सर, डॉ. रामचंद्र खोचरे, माजी सरपंच सत्यवान शिंदे, युवराज विश्वंभर चव्हाण, सोमनाथ चव्हाण, रामचंद्र चव्हाण, पंडित साठे, माऊली खोचरे, बाळू मोटे, सोमा चव्हाण, भैया पवार, पांडुरंग माळी, समाधान माळी, काका ढवण, वडवळचे सुरेश शिवपूजे आप्पा, सुनील पवार, राहुल शिवपूजे, मंदार वाघमारे पाटील, पद्मिनी शेट्टीयार, शिल्पा चांदणे, जितू वाडेकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या