मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या वतीने रुपये १ कोटी रकमेच्या निधीचा धनादेश सुपूर्त!

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. महायुती सरकारच्या वतीने तर शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत होत आहे. परंतु शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिल्लक ठेवीपैकी रुपये १,००,००,००० (एक कोटी) चा धनादेश सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सुपूर्द केला.

बार्शीतील अनेक समाजसेवी संस्था,डॉक्टर,उद्योजक, व्यापारी,विविध संघटना यांनी देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केलेली आहे. बार्शी तालुक्याच्या वतीने विविध माध्यमांतून आत्तापर्यंत रुपये १,२९,०३,२११ रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या