पुरग्रस्तांना मदतीचे तीन ट्रक रवाना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती, दि. 13 : राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागात मदत म्हणून पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे जीवनावश्यक साहित्य रवाना करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्याच्या तीन ट्रकला हिरवी झेंडी दाखविली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज अमरावती येथून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या ‘पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप’तर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य घेऊन जाणाऱ्या तीन ट्रकला झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रविंद्र चव्हाण, प्रविण तायडे, राजेश वानखेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यापूर्वीही प्रवीण पोटे पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्यावतीने दिवाळीनिमित्त नागरिकांना देण्यात येणारा शिधाचे वाटप केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या