बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये साई संजीवनी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाणे व साई संजीवनी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त बार्शी तालुक्यातील पोलीस बांधवांसाठी बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटपचे शिबीराचे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक सुधीरभाऊ गुळमे यांच्यासह 55 पोलीस बांधवांची तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्त तपासणी, शुगर तपासणी, बी. पी., रक्तगट व ईसीजी आदी प्रकारच्या तपासण्या करून आवश्यकतेनुसार मोफत औषधे देण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी साई संजीवनी हॉस्पिटल च्या समाजकार्याचे व वैद्यकीय सेवेचे कौतुक करत आभार मानले.

याप्रसंगी साई संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉ. राहुल मांजरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नयन बरबडे, डॉ. दस्तगीर शेख, डॉ. विजूदादा खुने, राकेश बाबर, निशाद सिस्टर, फैसल, संदीप ताकभाते, संदीप नागरगोजे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या