महिला शेतकरी सशक्तीकरण योजनेअंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश, महिला ग्रामसंघानी 1 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूर सेस फंडातून कृषी विभागकडून महिला शेतकरी सशक्तीकरण (महिला किसान शक्तीपंख योजना) या योजनेअंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. ड्रोन खरेदी अर्थसाहाय्य या घटकांतर्गत सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी एकुण किमतीच्या 40 % किंवा 4 लाखाच्या रक्कमेच्या मर्यादित राहून अनुदान देण्यात येत आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचे कडील नोंदणीकृत असलेला तालुक्यातील महिलास ग्रामसंघ अर्ज करण्यास पात्र राहिल. महिला ग्रामसंघ लाभार्थ्यांची निवड हि लॉटरी पध्दतीने ऑफलाईन करण्यात येईल, यासाठी तालुकास्तरावरून अर्ज मागविण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जातून लॉटरी प्रक्रियेव्दारे लाभर्थी निवड झाल्यानंतर निवडपत्र लाभार्थीस देण्यात येईल. महिला ग्रामसंघाच्या सदस्यापैकी एकाची ड्रोनपायलट म्हणून निवड करण्या यावी.
महिला शेतकरी गटासाठी विकास योजनेत महिला ग्रामसंघातील पायलट होणाऱ्या महिलेकरीता तिचे वय 18 वषापेक्षा कमी आणि 50 पेक्षा जास्त नसावे. तिची किमान पात्रता इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ती मानसिक आणि शारीरिक दृष्टया तंदुरूस्त असावी आणि DGCA मान्यमाप्राप्त RPTOS कडून ड्रोन पायलटचे प्रशिक्षण घेण्यास इच्छूक असावी.
महिला ग्रामसंघातील पायलट परवाना मिळण्यासाठी DGCA व्दारे निर्दिस्ट केलेल्या संस्थेकडून अधिकृत पायलट प्रशिक्षण पूर्ण असल्याची खात्री करावी. तसेच यापूर्वी महिला ग्रामसंघाने केंद्र, राज्य पुरस्कृत किंवा अन्य कोणत्याहि योजनेतून ड्रोन या बाबीचा लाभ घेतलेला नसावा.
कृषी विभागाकडून सन 2025-26 करिता ड्रोन उत्पादकांचे यादीतील ड्रेान उत्पादकांपैकी कोणत्याहि एका उत्पादकाकडून ड्रोन खरेदी करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे सुची मध्ये असलेल्या 15 उत्पादकापैकी कोणत्याहि एका उत्पादका ड्रोन खरेदी करणे बंधणकारक राहिल.
तरी इच्छूक महिला ग्रामसंघानी दि.01 नोव्हेंबर 2025 पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत , असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, अति.मुख्यकार्यकारी अधिकारी, व कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे.




