“जागतिक टपाल दिना” निमित्त उदयकुमार पोतदार यांचे ४१ देशातील आंतरराष्ट्रीय पोस्टतिकीटे, देशविदेशातील पाकिटे, पोस्टकार्ड,फस्ट- डे कव्हर्स, यांचे भव्य प्रदर्शन..
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे जागतिक टपाल दिनानिमित्त उदयकुमार पोतदार बार्शी यांचे दुर्मीळ पोस्ट कार्ड व तिकिटे,पाकिटे यांचे प्रदर्शनाचे उद्घघाटन राहुल जाधव जनसंपर्क निरिक्षक मुख्य पोस्ट ऑफिस,बार्शी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या वेळी वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ, प्रमोद भंडारी, उदयकुमार पोतदार,सुनिल फल्ले, विजुदादा खुणे, पोस्टमन श्रीराम बनसोडे, संजय जोशी, विनायक बोटे, अश्रुबा ढगारे, तुषार ढाकणे, गणेश घोलप दै. जनमत, पत्रकार, श्रीमती सुरेखा कोरे-गाढवे हे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे राहुल जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व त्यांनी पोस्टाच्या विविध योजनाची माहिती सांगितली. उदयकुमार पोतदार यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना जागतिक टपाल दिना निमित्त त्याचे संग्रहा बद्दल, पत्र लेखनाबद्दल,या त्यांच्या प्रवासा बद्दल माहिती सांगितली. या नंतर प्रमुख पाहुणे राहुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोस्टमन श्रीराम बनसोडे, संजय जोशी, विनायक बोटे, अश्रुबा ढगारे,तुषार ढाकणे यांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाला किरण कोकाटे, पत्रकार गणेश गोडसे, डॉ.मोरे जी.ए. रविराज तुंगतकर,राहुल वाणी,अजय तिवारी,या मान्यवरांनी प्रदर्शनास भेट दिली. या वेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रदर्शन पाहण्याचा आनंद घेतला. एका वाचकाने ( विद्यार्थ्यांनीनी )आपल्या मनोगत व्यक्त करताना मी माझ्या जीवनात हे प्रदर्शन पहिल्यांदाच पाहिले,ह्याची गरज सध्या विद्यार्थ्यांना आहे. हे प्रदर्शन भरवल्या बद्दल आयोजकाचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव,सहा ग्रंथपाल शितल लुकडे,क्लार्क विराज पतंगे यांनी परिश्रम घेतले.




