सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा बार्शी तीव्र निषेध
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काल एका वकिलाने हल्ला केला त्याचा बार्शी मध्ये महाविकास आघाडी च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृष्णराज बारबोले ,राष्ट्रवादी ओ बी सी विभाग शहराध्यक्ष नितीन भोसले, काँग्रेस अध्यक्ष ऍड निवेदिता आरगडे , एडवोकेट पांडुरंग घोलप, ऍड विक्रमसिंह पवार, .प्रथमेश गवळी ,बार्शी शहर शिवसेनाप्रमुख दिनेश नाळे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
बार्शी तहसील समोर निषेध आंदोलन केल्यानंतर बार्शीचे तहसीलदार शेख यांनी निवेदन स्वीकारले या निवेदनामध्ये हल्ला केलेला वकील यास कठोर शासन व्हावे तसेच हा हल्ला म्हणजे सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला नव्हे तर लोकशाही वर झालेला हल्ला आहे अशी भूमिका यावेळी नितीन भोसले यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना कृष्णराज बारबोले म्हटले की सरन्यायाधीशा वरील हल्ला हा निंदनीय आहेच परंतु संपूर्ण देशावर सनातनी लोक विविध मार्गाने हल्ले करत आहेत आता थेट न्यायव्यवस्थेवर हल्ला केल्याने या देशातील नागरिक भयभीत झाले असून याविषयी तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. काँग्रेस अध्यक्ष निवेदिता आरगडे यांनी ही निषेध व्यक्त केला. यावेळी सुरज मुल्ला, आदित्य माने, दत्ता पोफळे व इतर उपस्थित होते.




