जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रम संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे, दि. ६ : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण, पुणे विभाग, सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, समाजकल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, ज्येष्ठ नागरिक संघ व संस्थांचे प्रतिनिधी, कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, गृहप्रमुख, गृहपाल, समाजकार्य महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

श्रीमती कोचुरे म्हणाल्या, प्रशासनाला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करायला मिळणे हे भाग्याचे आहे. आपल्यातील उत्साह, आनंद, सामाजिक कार्यातील ओढ या सर्व गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत असेही त्या म्हणाल्या. लोंढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी समाजकल्याण विभाग सदैव तत्पर राहील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

समाजकल्याण विभागाच्यावतीने ज्येष्ठांसाठी विशेष कार्य करणाऱ्या दिलीप पवार, चंद्रकांत महामुनी, दशरथ भालेराव, शामकाका पेशवे, चंदा मानकर, चारुता कडुरकर व वैजयंती जगताप आदींचा व इंटरनॅशनल लॉज्युटी सेंटर, पुणे, हेल्पेज इंडिया संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासण्या ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे आणि जिल्हा शल्य चिकित्सालय, औंध येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या