पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांची प्रभावी अंमलबजावणी – मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाची तत्परता, पूरग्रस्त प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाणार.
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि. ०५ : जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन केले आहे. पूरग्रस्त गावातील एक ही नागरिक आरोग्य तपासणी पासून वंचित राहणार नाही या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने काटेकोरपणे नियोजन केले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगल यांनी दिली.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली तर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले व तालुका आरोग्य अधिकारी ही मोहिम प्रत्यक्षपणे राबवत आहेत.
कमती बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत शिरपूर मो. येथे आरोग्य शिबिर :
पूरग्रस्त शिरपूर मो. गावात आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंच आनंद विलास बळवंतराव, ग्रामपंचायत अधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजीत बाबर, समुदाय आरोग्य अधिकारी अकबर मुजावर, आरोग्य सेविका माधवी सोकल, आरोग्य सेवक अल्कुंते, सागर लगड, युवराज नरुटे तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. ग्रामस्थांना प्राथमिक उपचार, समुपदेशन व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोळेगाव व आष्टे येथे शिबिर
उपकेंद्र वडवळ अंतर्गत कोळेगाव व आष्टे गावांमध्येही आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. पूरग्रस्त नागरिकांना आरोग्य सेवा, समुपदेशन व आवश्यक औषधोपचार देण्यात आले. या शिबिरास डॉ. बंडगर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने दिशा मिळाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरूडकर यांनी शिबिरास भेट देऊन कामाची पाहणी केली. पंचायत समिती मोहोळ व शिरापूर आरोग्य केंद्रातील कर्मचारी पूर्ण क्षमतेने सहभागी झाले.
कोळेगाव शिबिरात स्थानिक सहभाग : कोळेगाव येथे उपसरपंच नानासाहेब देशमुख, सदस्य बाळासाहेब दायगडे, ग्रामपंचायत अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी वर्षा थोरात, जयवंत देशमुख, सागर लामगुंडे, आरोग्य सहाय्यिका श्रीमती माडेकर, सेविका श्रीमती अल्दी, सहाय्यक कोतकोंडे, सेवक नामदेव जाधव, जिलानी शेख, आशा गटप्रवर्तक वाघमारे व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीसह स्वच्छतेविषयक मार्गदर्शनही करण्यात आले.
प्रशासनाचा समन्वय व तत्परता : मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नियंत्रणाखाली आरोग्य विभागाने पूरग्रस्त गावांमध्ये तातडीने आरोग्य सेवा पोहोचवून नागरिकांचे आरोग्य सुरक्षीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नवले यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, प्रत्येक गावात स्थानिक प्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वीपणे राबवली जात आहे.




