बार्शीतील कोठारी शोरूम टॉपलाच..दसऱ्याच्या मुहूर्तावर 68 गाड्यांची विक्री
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी – मागील तीस पस्तीस वर्षांपासून सेवेत अग्रेसर असलेल्या बार्शीतील कोठारी शोरूमने आज दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल 68 वाहनांची विक्री करून व्यवसायातील आपला दबदबा कायम ठेवला हिरो कंपनीची सर्व मॉडेल सर्व रंगात व योग्य किंमतीमध्ये, विक्री पश्चात उत्कृष्टसेवा, ओरिजिनल सर्व स्पेअर्स, उत्कृष्ट सर्व्हिसिंग, इत्यादी कारणामुळे कोठारी शोरूमचे आजही नाव आहे.
बार्शी तसेच भूम,परांडा, माढा, कुर्डुवाडी इत्यादी ठिकाणाहून ग्राहक आवर्जून येतात. शोरूमचे संस्थापक स्व दीपकशेठ, स्व कुमारशेठ, जयेशभाई आणि तसेच सागरभाई असे घरातील चार कर्ती माणसं अचानक व अकाली गेले तरीही खचून न जाता धार्मिल दीपक कोठारी सोहम कुमार कोठारी या दोन तरुणांनी कोठारी शोरूम, कोठारी पेट्रोल पंप, भारत गॅस, इत्यादी विविध एजन्सीज उद्योग व्यवसाय मोठया जोमाने संभाळला आहे.
व्यवसाया बरोबरच माणसं ही संभाळली आहेत. म्हणूनच रणजित यमदे, रामभाऊ कानकात्रे, राजेंद्र आगलावे,नागनाथ उंबरे, पोकळे सारखे जुने सहकारी आजही मोठया निष्ठेने काम करताना दिसतात तसेच सर्व ठिकाणचे जवळपास पाऊनशे पेक्षा जास्त कामगार काम करतात.




