अशोक वाटिकेत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
B1न्यूज मराठी नेटवर्क
अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोल्यातील अशोक वाटिका येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांसह बौद्ध वंदना घेऊन तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तसेच उपस्थित बौद्ध बांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सदस्या अरुंधतीताई शिरसाठ, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने, भारतीय बौद्ध महासभेचे अकोला अध्यक्ष पी. जे. वानखेडे यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बौद्ध धम्माच्या शिकवणीचे महत्व पटवून देत, समाजात बंधुता, समता आणि प्रबोधनाचा संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले.




