भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई / दुबई : भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकवीला आहे.भारताचे संविधान साकार करण्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव योगदान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या चळवळीचे मुख्य महत्वाचे उदिष्ट स्वाभिमान जागवणे हेच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला स्वाभिमान शिकविलेला आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दुबई येथील डबल ट्री हॉटेल मध्ये स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 चे वितरण केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ना. रामदास आठवले बोलत होते.

स्वाभिमान फाऊंडेशन च्या वतीने स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ना. रामदास आठवले प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. यावेळी ना. रामदास आठवले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना स्वाभिमान इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक संविधान फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तीलक राज मलिक होते. तसेच यावेळी दुबई मधील गल्फ मेडिकल युनिव्हर्सिटी चे संस्थापक डॉ. थंबे मोहिदीन आणि अल् जोहरा हॉस्पिटलचे डॉ. राजु लोचन, फखर सिध्दीकी आदी मान्यवर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या