विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते बार्शी पोलिसांचा भव्य सत्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या धाडसी पथकाने केलेल्या 693 किलो गांजाच्या जप्तीच्या ऐतिहासिक कारवाईसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे व त्यांच्या संपूर्ण टीमचा भव्य सत्कार करण्यात आला.
हा सन्मान सोहळा मोहोळ येथे पार पडला. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी ढेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक सायकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्याची ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्रातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वात मोठी कारवाई ठरली असून, या यशस्वी मोहिमेबद्दल बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाचे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या सन्मानामुळे बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे मनोबल उंचावले असून, गुन्हेगारीविरुद्धच्या लढाईत त्यांच्या प्रयत्नांना मोठा सन्मान लाभला आहे.




