केसरी शक्ती नवरात्राच्या रक्तदान शिबिरात 151 जणांनी रक्तदान
सन्मानपत्र मंडळास देताना… रामभाई शहा ब्लड बँक, बार्शीचे पदाधिकारी
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : येथील कासार गल्ली केसरी शक्ती नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात 151 रक्तदात्यांनी उस्फुर्त पणे रक्तदान केले. यावर्षी नवरात्र महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. दरवर्षी या मंडळाकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत केली जाते.
यावर्षी या भव्य रक्तदान शिबिरासाठी मंडळाचे बाळासाहेब कासार, महेश कासार, प्रशांत दिक्षित, प्रकाश कासार, नितीन रणदिवे, अरुण साखरे, मनोज दिक्षीत, धनंजय माने, सचिन रणदिवे, सचिन कासार, बालाजी गवळी, सुधीर मस्के,सर्व्हेश कासार, सोहम रणदिवे पिऊष कासार, प्रितम रणदिवे, श्लोक कासार आदिंची परिश्रम घेतले.




