युवा उद्योजक शिवाजीराव पवार यांची जनकल्याण गौरव पुरस्कार साठी निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क प्रतिनिधी : गौतम नागटिळक
वैराग : येथील युवा उद्योजक शिवाजीराव पवार यांना सोलापूर येथील जनकल्याण फाउंडेशनच्या निवड समितीच्या वतीने जनकल्याण गौरव पुरस्कार 2021 साठी निवड आली आहे . फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार सोहळा 14 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये निर्मलकुमार फडकुले सभागृहात देण्यात येणार आहे.
पवार हे बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील रहिवासी असून त्यांना हा पुरस्कार 21 वर्षापासून तरुण महिला उद्योजक बचत गट यांना दिलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे तसेच उद्योजकता विकासामध्ये केलेल्या विशेष कामामुळे या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे .त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नवउद्योजकांना कौशल्य विकासाचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले आहेत.
तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता माहिती अधिकार कायदा व लोक सेवा हमी कायदा याचे प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी तथा यशदा पुणे यांच्या वतीने राज्यभर दिले असल्यामुळे त्यांचा प्रशिक्षण क्षेत्रांमध्ये विशेष ठसा आहे. यापूर्वी त्यांना अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळाले असून वेगवेगळ्या आकाशवाणी टीव्ही चॅनेल्स युट्यूब यावर त्यांच्या युवकांसाठी प्रेरणादायी व्हिडिओ आणि कार्यक्रम प्रसारित झाले आहेत त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरावरून त्यांच्यावर विशेष अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या