मानव अधिकार दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पुणे येथे संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त पुणे पत्रकार भवन येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यात बार्शीतील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर आणि मानव अधिकार कार्यकर्ते मनीष देशपांडे यांना प्रताप डी.सावंत (न्यायाधीश) व ॲड. असीम सरोदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था, पुणे जिल्हा विधी प्राधिकरण व जाधवर ग्रुपच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रताप डी. सावंत (न्यायाधीश) असून डॉ. ए. बी नांदापुरकर, ॲड. असीम सरोदे, कैलास आढे, डॉ. सुधाकर. जाधवर , सुभाष वारे, देव गिल, ऍड शार्दुल जाधवर, डॉ.हमिनी आडवे, सतीश गोवेकर, ॲड. सचिन झाल्टे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मानवाधिकार पुरस्काराने डॉ.राजेंद्र वावळे, विजय चव्हाण, शारदा ताई मुंढे, दिनेश काटकर, सोहनी डांगे, डॉ.अभिजित सोनवणे व माणुसकी संस्था यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर विशेष मानवाधिकार पुरस्काराने अण्णा जोगदंड,गीतांजली रिटे, मा. शांकाल शेख, मनीष देशपांडे, मनीष श्रफ, प्रणित मटकैकार यांना गौरविण्यात आले.तसेच बार्शी येथे नियुक्ती केलेल्या पदाधिकारी यांना देखील नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल. याबाबत अधिक मार्गदर्शन मान्यवरांनी करून पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या