७,८,९ जानेवारी बार्शीत सहावे समतावादी साहित्य संमेलन : डॉ. प्रा. मच्छिंद्र सकटे

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : समतावादी सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य व फुले,शाहू,आंबेडकर,अण्णा भाऊ,अमर शेख विचार प्रतिष्ठान बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने ७,८,९ जानेवारी २०२२ रोजी येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह मध्ये सहावे राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती समतावादी सांस्कृतिक चळवळीचे प्रणेते, दलित महासंघाचे संस्थापक /अध्यक्ष डॉ प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी काल बार्शी येथे श्री शिवाजी महाविद्यालय हॉल नंबर १४ येथे पार पडलेल्या संयोजन समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. ही बैठक श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार तथा समतावादी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष जयकुमार शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, प्राचार्या भारती रेवडकर कार्याध्यक्ष संदीप आलाट निमंत्रक सुनील अवघडे व इतर सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली ७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडी ने सुरुवात होणार असून शनिवार दिनांक ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सदर होणाऱ्या समतावादी साहित्य संमेलनात पाच परिसंवाद एक प्रकट मुलाखत निमंत्रित व नवोदितांचे कवी संमेलन,कथाकथन, शाहिरी जलसा विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार व दि.९ सायं ६ वाजता.समारोप असा भरगच्च कार्यक्रम असून साहित्यिक लेखक कवी यांच्यासह साहित्यप्रेमी जनतेला देखील याची पर्वणी मिळणार आहे.
बैठकीस यावेळी संयोजन समितीचे कवी शब्बीर मुलानी, वसीम पठाण, गणेश गोडसे, सौ सुरवसे सौ राठोड मॅडम, डॉ.बी.रा.पारसे. राम नवले, उमेश पवार ,निलेश खुडे, अमोल आंधळकर, सतीश झोंबाडे, महादेव भिसे संगीत राव शिंदे आदी उपस्थित होते.