दिव्यांग सप्ताह दिन विविध उपक्रमांनी साजरा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शी व नगर परिषद शिक्षण मंडळ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपालिका शाळा क्रमांक 2 येथे दिव्यांग सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लुईस ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत जाधव, नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, पर्यवेक्षक संजय पाटील, मुख्याध्यापक महेश नेवरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बार्शी शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याप्रसंगी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य नगरपरिषदेच्या माध्यमातून मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गटशिक्षणाधिकारी लक्ष्मीकांत जाधव, पर्यवेक्षक संजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समावेशित शिक्षण विशेष तज्ञ अतुल बोराडे यांनी केले. याप्रसंगी विशेष तज्ञ मनोज जगदाळे, अतुल बोराडे, विशेष शिक्षक धनंजय थिटे, सचिन पाटील, तुषार वाणी, मुकुंद पिंगळे, दत्तात्रय काठमोरे, विजय जाधवर, सुहास जाधव, शारदा कराड, स्वप्नाली नाईकवाडी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष तज्ञ व विशेष शिक्षक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शहरातील विविध शाळेचे मुख्याध्यापक पालक दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या