विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 103 जणांनी रक्तदान ,122 जणांनी दंत चाचणी केली

भिमटायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था बार्शी, आयोजित भव्य रक्तदान शिबिर व मोफत दंत रोग तपासणी व मोफत दात काढणे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भिमटायगर मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था बार्शी, आयोजित भव्य रक्तदान शिबिर व मोफत दंत रोग तपासणी व मोफत दात काढणे शिबीर आयोजित करण्यात आले होते. डाॅ. विनोद भालेराव व डाॅ. सोनाली भालेराव यांचे शिबिरात मोलाचे सहकार्य लाभले. या शिबिरात 103 जणांनी रक्तदान केले. 122 जणांनी दंत चाचणी करून शिबिराचा लाभ घेतला आहे. शिबिराला चांगला प्रतिसात मिळाला.बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली. प्रमुख उपस्थित नगराध्यक्ष ॲड.असिफभाई तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश (आण्णा) पाटील, आरोग्य सभापती संदेश काकडे, दीपक (आबा) राऊत , सुनील अवघडे (दलित महासंघ जिल्हाध्यक्ष), ॲड. राजश्री डमरे, ॲड. वसुदेव ढगे, विशेष उपस्थिती ॲड. सुप्रिया गुंड पाटील ( जिल्हाध्यक्ष ) महिला राष्ट्रवादी काँग्रेस), ॲड. उषा पवार इतर मान्यवर उपस्थित होते.
शंकर (दादा) वाघमारे, दयावान (आप्पा) कदम, राहुल (भैया) बोकेफोडे, नितीनदा मस्के, भालचंद्र राजगुरू (सर), निलेश वाघमारे, अजय कदम, मिलिंद ताकपिरे (सर), ॲड. वृषाली वाघमारे, ज्योती बोकेफोडे, प्रियांका कदम व भिम सैनिक उपस्थित होते.