ग्रामविकास मंत्र्यांच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातून जाणार हजारो ग्रामपंचायत कर्मचारी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी पासून सातारा येथे सुरू होत असणाऱ्या ग्रामविकास मंत्र्यांच्या विरोधात होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनात सोलापूर जिल्ह्यातून हजारो ग्रामपंचायत कर्मचारी जाणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी दिली आहे.

या आंदोलनामध्ये किमान वेतनाची नियमाप्रमाणे पुनर्रचना करा , सात वर्ष प्रलंबित यावलकर समितीने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी करा, अन्यायकारक उत्पन्नाची अट रद्द करा, प्रायव्हेट फंडाचा हिशोब वेळेत द्या , महासंघाने संघर्ष करून मिळवलेले प्रमोशन मधील दहा टक्के आरक्षणाची याची दरवर्षी अंमलबजावणी करा, कालबाह्य झालेला आकृतीबंध रद्द करा या मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत.

अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन प्रश्न प्रलंबित राहिल्याने व त्याचा परिणाम कर्मचाऱ्याच्या असल्यामुळे आर्थिक जीवनाच्या ओढाताणीवर होत असल्याने; अत्यंत न्याय्य मागण्यांकडेही महाराष्ट्राचे ग्रामीण विकास खाते दुर्लक्ष करीत आहे. यापूर्वी एखाद्याचे मा. मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे वेळोवेळी निवेदना दिली आहेत. मंत्रालयात त्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

दिनांक 14 मे 2025 रोजी त्यांनीच बोलवलेल्या बैठकीला महासंघाचे प्रतिनिधी हजर राहिले त्या बैठकीत त्यांनी शासन सर्व प्रश्न सकारात्मक सोडवी आम्हाला एक महिन्याची मुदत द्या; बैठकीचे इतिवृत्त पंधरा दिवसात पाठवण्यात येईल असे सांगण्यात आले परंतु आजतागायत कोणत्याही गोष्टीची पूर्तता केली गेलेली नाही. त्यामुळे आंदोलन करून त्यांचे लक्ष वेधण्यासाठीदिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे सुरू होत आहे. हे आंदोलन राज्यव्यापी स्वरूपाचे आहे.

सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्याशिवाय हे धरणे आंदोलन थांबणार नाही. महाराष्ट्रातील शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी होत आहेत. या आंदोलनाचा निर्धार महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे, महासचिव कॉम्रेड नामदेव चव्हाण, संघटक सचिव कॉम्रेड ए.बी. कुलकर्णी, कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर, कॉम्रेड राहुल जाधव यांच्याबरोबरच साताऱ्याच्या पूर्ण आंदोलनाची जबाबदारी त्या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे तसेच महासंघाचे पदाधिकारी असलेले सातारा जिल्ह्याचे नेते कॉम्रेड शाम चिंचणे यांनी घेतलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या