सेंद्रिय भाजीपाला लागवड परसबाग स्पर्धा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : लायन्स क्लब बार्शी रॉयल, तिरुपती ऍग्रो एजन्सीज बार्शी व VK मार्ट बार्शी यांच्या संयुक्ततेने
बार्शी शहरासाठी सेंद्रिय भाजीपाला परस बाग लागवड स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे आत्तापर्यंत गरजवंत नागरिकांसाठी वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.
त्याच धर्तीवर सध्याच्या वातावरणातील बदल व केमिकल युक्त भाजीपाल्यामुळे नागरिकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत आहे. त्याच्यासाठी लोकांना आपल्या परस बागेकडे प्रवृत्त करून घरच्या घरी भाजीपाला लागवडी चे आयोजन व मार्गदर्शन संयोजकांकडून करण्यात येणार आहे .
लोकांना आपल्याघरीच सेंद्रिय भाजीपाला चे उत्पादन व रोगमुक्त जीवन जगता यावे म्हणून या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम बार्शी शहरासाठी आयोजित करीत आहोत.
तरी लायन्स क्लब बार्शी रॉयल , तिरुपती ऍग्रो एजन्सीज बार्शी व VK मार्ट बार्शी यांच्याकडून बार्शीतील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून परसबाग चे भागीदार व्हावे ही विनंती आहे. सहभाग नोंदविणाऱ्यांसाठी याही वर्षे तिरुपती ऍग्रो एजन्सीज, गाळा नंबर 28 ,तुळजापूर रोड बार्शी यांच्याकडून मोफत भाजीपाला बियाण्याचे वाटप होणार आहे.
याचा कालावधी 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 असा असणार आहे . त्यानंतर स्पर्धा बी लागवडी पासून पुढील एक महिना याचे निरीक्षण करून चांगली परसबाग फुलवणाऱ्यांसाठी पहिले तीन बक्षीस VK मार्ट बार्शी यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच लायन्स क्लब बार्शी रॉयल कडून पहिल्या तीन व्यक्तींना ट्रॉफी पण देण्यात येणार आहे व प्रत्येक सहभागीदारांसाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
क्लबचे अध्यक्ष डॉ. तेजस लाड, प्रकल्प प्रमुख मंगेश बागुल , नितीन अणवेकर, तन्मय बुडख, वि. के. मार्ट चे गिरीश झंवर, यांनीही अशी माहिती दिली. आयोजक लायन्स क्लब बार्शी रॉयल तिरुपती अग्रो बार्शी VK मार्ट बार्शी यांनी केले आहे.




