आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई; सरकारला निर्देश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाकडून मनाई करण्यात आली आहे. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल, असे मुंबई हायकोर्टाचे एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान निर्देश दिले आहेत. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत उपोषणाला येणे टाळावे, अशी विनंती करण्यासाठी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे यांनी अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची भेट घेतली. राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका या भेटीनंतर जरांगेंनी मांडली. आम्ही मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, तरंच आम्ही माघार घेऊ, असं जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे जाण्याचा मार्ग सांगितला होता. “अंतरवाली सराटी येथून 27 ऑगस्टला निघून पुढे आम्ही छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे या मार्गे लोणावळा, वाशी आणि चेंबूरमधून मुंबईतील आझाद मैदान इथं पोहोचणार आहोत. 27 ऑगस्टला रात्री आमचा मुक्काम किल्ले शिवनेरीवर असेल. शिवनेरी किल्ल्यावर माती कपाळी लावून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला शिवनेरीहून मुंबईला निघू आणि 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचू,” असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या