प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत प्रगतीचे उंच शिखर गाठत आहे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
इंडो अरब इंटरनॅशन्ल एक्सलन्स अवॉर्ड चे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते वितरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
दुबई / मुंबई दि.25 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भारत प्रगतीचे उंच शिखर गाठत आहे.जगभर भारत देशाचा लौकीक वाढत आहे.संयुक्त अरब अमिरात आणि भारत देशाचे संबंध दृढ मैत्रीचे आहेत. दुबईत 40टक्के पेक्षा जास्त भारतीय आहेत. दुबईत हॉटेल व्यवसाय बँकींग क्षेत्र,रियल ईस्टेट या क्षेत्रात भारतीयांचा दुबईत प्रभाव आहे. दुबईतील राज्यकर्त्याचा दुबईत राहणाऱ्या भारतीयांना पाठिंबा आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
दुबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडो अरब इंटरनॅशन्ल एक्सलन्स अवॉर्ड चे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना वितरण करण्यात आले. ग्लोबल मिडीया फॅशन लिगच्या वतीने इंडो अरब इंटरनॅशन्ल एक्सलन्स अवॉर्ड आणि फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते.या पुरस्कार सोहळ्यात अनेक मान्यवरांना ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्यात शारजा चे राजे सुलतान अल कासमी चे सल्लागार शेख सुलतान अल कासीम हे उपस्थित होते. भारतातील प्रसिध्द कलाकार प्रभुदेवा, निर्माते अरबाज खान तसेच अनेक मान्यवरांना ना.रामदास आठवले यांच्या हस्ते इंडो अरब इंटरनॅशन्ल एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ग्लोबल मिडीया फॅशन लिग चे अध्यक्ष तनविर अबुबकर यांनी केले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.




