बार्शीमहाराष्ट्र

बार्शीमध्ये मराठा समाजाचा एल्गार : समाजातील तरुण एकत्र येत केला निर्धार…

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सकल मराठा समाजाच्या वतीने आज 29 ऑगस्ट रोजी मुंबई दौऱ्याच्या निम्मित आणि मराठा समाजासमोरील इतर प्रश्नांच्या मुद्द्यावर विचार विनिमय बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत मराठा समाजातील युवकांनी एकत्रित येऊन एल्गार करत, येत्या 29 ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनाने मुंबईला जाण्याचा निर्धार मराठा बांधवांनी केला.

बार्शी शहर आणि तालुका पहिल्या पासूनच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून इथून पुढे देखील त्यांच्या सोबत कायम राहण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला. तसेच आरक्षणानंतर देखील समाजासमोर अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून प्रयत्न केले जावे यावर देखील एकमत झाले.

यावेळी मराठा राज्य समन्वयक ॲड गणेश हांडे, व शुभम चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले,मराठा सेवक, महेश देशमुख, निलेश शिंदे, विकी शिंदे, भैय्या गव्हाणे, शुभम तुपे, रोहित पाटील, अमोल पोटे , सोमा कदम, राहुल बारंगुळे, अभी बारंगुळे, विश्वजीत पवार. बालाजी कानगुडे, यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button