पोलिस पाटलाला मारहाण करून तांदळाचे कट्टे पळविले चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा
Oplus_16908288
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील गुळपोळी गावामधील स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तोडून पोलिस पाटलास मारहाण करून तांदळाचे कट्टे घेऊन गेले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास खंडोबा मंदिरासमोर स्वस्त धान्य दुकान, गुळपोळी, ता. बार्शी येथे घडली आहे.
याबाबत पोलिस पाटील बाळकृष्ण पिसे (वय ३८, रा. गुळपोळी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी निशिकांत विजय चिकणे, प्रशांत श्रीधर मचाले, धन्यकुमार शिवाजी चिकणे, सिराज युनूस शेख (सर्व रा. गुळपोळी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद यांनी शनिवारी गावातील त्यांना माहिती दिली की, त्यांच्या आई शोभा पिसे यांच्या नावावर असलेल्या स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तोडून काही लोक तांदळाचे कट्टे कारमध्ये चढवत आहेत.
फिर्यादी यांनी ही माहिती बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप ढेरे, तसेच बीटचे अंमलदार हेड कॉन्स्टेबल अमित घाडगे यांना दिली. फिर्यादी घटनास्थळी पोहोचल्यावर वरील संशयित चार जण दुकानातील तांदळाचे कट्टे गाडी (क्र. एमएच १२ एफवाय ९८९७) मध्ये भरताना दिसून आले. फिर्यादींनी संशयितांना थांबवून विचारणा केली असता, “तू कोण विचारणार?” असे म्हणत त्यांनी विरोध दर्शविला. आरोपींने फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली.




