उपाजिल्हाधिकारी वसंतराव पवार यांच्या पत्नी व पत्रकार उमेश पवार यांच्या मातोश्री कै. शोभा (सोजर) पवार यांचे निधन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : कसबा पेठ, अण्णा भाऊ साठे नगर येथील जेष्ठ नागरिक सौ. शोभा ऊर्फ सोजर वसंतराव पवार (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी (दि. २३ ऑगस्ट) निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
सौ. पवार या स्वभावाने अत्यंत शांत, धार्मिक वृत्तीच्या व सर्वांना आपलेसे करणाऱ्या होत्या. समाजातील प्रत्येकाशी त्यांनी जपलेले स्नेहसंबंध आज अनेकांना आठवत आहेत. त्यांच्या निधनाने परिसरातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तीमत्त्व हरपले आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे तसेच परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्या बार्शी शहरातील सकाळ दैनिकाचे पत्रकार उमेश पवार यांच्या मातोश्री होत. कुटुंबीयांच्या व्यासंगी वृत्तीला त्यांनी दिलेला पाठिंबा व मूल्यांचा वारसा आज पुढील पिढीला मार्गदर्शक ठरत आहे.
सौ. पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा आज (शनिवार, दि. २३ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजता त्यांच्या राहत्या घरून, कसबा पेठ येथून निघणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येईल. त्यांच्या निधनाने पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबीय व परिचितांत हळहळ व्यक्त होत आहे.




