नवीन आधार केंदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड दि.20 : रायगड जिल्ह्यातील नागरीकांचे नवीन आधार काढणे व आधारकार्ड वरील माहिती अद्ययावत करण्याकरीता जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण 74 आधार संच कार्यान्वित आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या व आधार केंद्रांची मागणी पाहता नवीन आधार केंद्रांची स्थापना करण्याची आवश्यकता आहे.
जिल्ह्यामध्ये नव्याने 99 आधार केंद्रांची स्थापना करण्याकरीता 15 तालुक्यांमध्ये नवीन आधार केंद्र सुरु करण्यासाठी इच्छुक पात्र असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमूना, पात्रतेचे निकष ही माहिती उपलब्ध आहे. इच्छुकांनी विहीत कागदपत्रासह आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी शाखा मध्ये समक्ष दि. 21 ऑगस्ट ते दि. 08 सप्टेंबर या कालावधीमध्ये सायंकाळी 06.15 वाजेपर्यंत जमा करावेत.
प्राप्त आधार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जाची छानणी दि.09 ते दि.16 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. प्राप्त आधार केंद्रांच्या मागणी अर्जावर जिल्हास्तरीय कार्यवाही दि.17 ते दि.25 सप्टेंबर दरम्यान करण्यात येईल.
रायगड जिल्ह्यातील रिक्त केंद्रांची महसूल मंडळ निहाय एकूण माहिती खालीलप्रमाणे- अलिबाग तालुका- किहीम, रामराज, सारळ, चरी, नागाव, कामार्ले, पोयनाड महसूल मंडळ:- एकूण-8, कर्जत तालुका- कशेळे, कडाव, कळंब, किरवली, पाधरज- महसूल मंडळ एकूण-8, खालापूर तालुका वावोशी, चौक, खालापूर, वासांबे- महसूल मंडळ एकूण-6, महाड तालुका महाड बिरवाडी, तुडौल, नाते, करंजाडी, खरवली, गोंडाळे, मांघरुण, शिरगांव महसूल मंडळ एकूण-16, माणगांव तालुका -,माणगांव, गोरेगांव, निजामपूर, लोणेरे, इंदापूर, मोर्चा, विळे महसूल मंडळ एकूण-10, म्हसळा तालुका म्हसळा खामगांव, मंदडी-महसूल मंडळ एकूण-5, तालुका मुरुड-बोर्ली, मुरुड, नांदगांव – महसूल मंडळ एकूण-3, तालुका पनवेल शहरी-ओवळे, पळस्पे, तळोजा, महसूल मंडळ एकूण-3, पनवेल ग्रामीण- पोयंजे, मोर्ब, कर्नाळा, नेरे महसूल मंडळ एकूण-6, पेण तालुकाहमरापूर, वाशी, कासु, कामार्ली- महसूल मंडळ एकूण-७ पोलादपूर-पोलादपूर कोंढवी, वाकण- महसूल मंडळ एकूण-5 रोहा-रोहा, कोलाड, चणेरा, घोसाळे, निडी त.अष्टमी, आंबेवाडी- महसूल मंडळ एकूण-8, श्रीवर्धन-श्रीवर्धन, वाळवटी महसूल मंडळ एकूण-3, सुधागड- पाली, नांदगांव, जांभूळपाडा, महसूल मंडळ एकूण-7, तळा-मांदाड, सोनसडे- महसूल मंडळ एकूण-4 असे एकूण 99 आधार केंद्र आहेत.




