दलित महासंघाचे “दलित मित्र गौरव” पुरस्कार जाहीर 23 ऑगस्ट रोजी होणार वितरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : दलित महासंघ बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव, खजिनदार जयकुमार शितोळे, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉक्टर प्रकाश बुरगुटे, तहसीलदार एफ आर शेख , पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर संजय अंधारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दलित महासंघाच्या वतीने देण्यात येणारा या पुरस्काराचे हे सलग अठरावे वर्ष असून साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येतो.
यावेळी या पुरस्काराचे मानकरी खालील प्रमाणे. 1)जीवन गौरव सुनील भराडिया ज्येष्ठ उद्योजक तथा समाजसेवक 2) बाळासाहेब चव्हाण मुख्याधिकारी तथा प्रशासक बार्शी नगरपालिका बार्शी यांना दलित मित्र विशेष गौरव पुरस्कार डॉक्टर सारंगा बुरगुटे- आव्हाड संचालीका शिवशक्ती बँक यांना सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
2025 चे दलित मित्र पुरस्काराचे मानकरी माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पाटील सचिन मांजरे पाटील उमेश बारंगुळे लोक व्याख्याते विशाल गरड विस्तार अधिकारी नितीन वाघमारे युवा उद्योजक राम डोंबे दशरथ टेकाळे व जय शिवराय प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेला यावर्षीचा दलित मित्र पुरस्कार जाहीर झाला असून ज्येष्ठ गौरव म्हणून प्राध्यापक श्रीधर कांबळे फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष व सूर्यकांत अण्णा लोंढे जेष्ठ रिपब्लिकन नेते पत्रकारितेतील पुरस्कार अरुण बळप आणि संजय बरबोले यांना जाहीर झाल्याची माहिती दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे व बार्शी शहर अध्यक्ष संदीप आलाट यांनी दिली.




