अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पाहणी

0

सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या.

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सततच्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टी व वादळी पावसामुळे उडीद, सोयाबीन, मुग, कांदा तसेच द्राक्षबागा या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी फळबागा व भाजीपाला पिकेही जलमय होऊन नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांची जीवितहानी, जनावरांचे नुकसान आणि काही ठिकाणी घरांची पडझडही झाली आहे.

आज खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले, वडाळा, कारंबा, नान्नज या अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातील पीक डोळ्यादेखत नष्ट होत आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान प्रचंड आहे. त्यांच्या यातना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. महसूल प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे, नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत. खरीप पिकांसोबत द्राक्षबागांच्या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी मी प्रयत्न करेन. तहसीलदार आणि कृषी विभागाने सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. असे सांगितले.

पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आलेले हे संकट गंभीर असून, त्यांना दिलासा मिळण्यासाठी शासनाने तात्काळ पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी काही शेतकऱ्यांनी ई- पिक पाण्याची नोंद सर्व्हर डाऊन असल्याने अडथळा होत असल्याची व पीक विमा योजनेबाबत तक्रार केली. यावर बोलताना म्हणाल्या ऑनलाईन ई – पिक पाणी नोंद व इतर अटी रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, उत्तर सोलापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पोळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, राष्ट्रवादीचे युवा नेते जयदीप साठे, काँग्रेसचे सचिन गुंड, वैभव घोडके, तात्या कादे, दाजी गोपने, शुभम शिराळ, शंकर मोरे, काशिनाथ माने, गणेश गरड, राजकुमार तगारे, प्रवीण पाटील, अमोल देशमाने, कृष्णात साठे, प्रताप टेकाळे, भारत भोसले, ग्रामस्थ संबंधित गावातील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक उपस्थित होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या