विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ, दि.12 : हवामान विभागाने दि.१२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार दि.१२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुर सदृश्य परिस्थिती असलेल्या भागात शक्यतो जाणे टाळावे. आकाशात विजा चमकत असल्यास सुरक्षितस्थळी जावे, झाडाखाली थांबू नये, नदी-नाल्यांच्या पुलांवरुन पुराचे पाणी वाहत असल्यास दुचाकी, चारचाकी, बैलगाडी नेणे टाळावे. जे रस्ते पुरामुळे वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी गावस्तरीय समितीचे कर्मचारी, कोतवाल यांना उपस्थित रहावे.
हवामान अंदाजबाबत माहिती सतेच ॲपचा वापर करावा. पुराच्या पाण्यात, धरण क्षेत्रात, पर्यटन या स्थळी जाऊन सेल्फी काढणे, रिल बनविणे इत्यादी प्रकार टाळावेत. सर्व तहसीलदारांनी नियंत्रण कक्ष चोविस तास अलर्ट ठेवून जिवीत व वित्त हानी तसेच पुरपरिस्थीतीच्या संबंधित आवश्यक मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून कार्यवाही करावी. संबंधित अहवाल वेळेवर सादर करावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी कळविले आहे.




