लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

लातूर,दि.११ : लोकनेते माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री विक्रम काळे, रमेश कराड, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर महापालिका आयुक्त श्रीमती मानसी मीना आदिंची उपस्थिती होती.

प्रारंभी कार्यक्रम स्थळी भारतीय संविधानाची प्रत देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पुतळयाच्या नामफलकाचेही अनावरण केले.

जिल्हा परिषदेच्या परिसरातील माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

जिल्हा परिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची उंची १४ फूट असून कांस्य धातुमध्ये हा पुतळा बनविला आहे.त्याचे वजन ९०० किलो आहे. ३४५१.५६ चौ.मी. जागेत हा पुतळा उभारण्यात आला आहे.पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम वास्तु विशारद विनय इंगळे यांनी काम पाहिले तर शिल्पकार विजय बोंदर व अंबादास पायघन यांनी पुतळा तयार केला. पुतळा उभारणी व सुशोभीकरणास १ कोटी ५१ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. पुतळा अनावरण कार्यक्रम प्रसंगी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या