शालेय मैत्री ही निस्वार्थी असते तिचा उपयोग एकमेकांच्या मदतीसाठी करा – अरुण दादा बारबोले
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी येथे सन 2000-2001 च्या इयत्ता 10 वी विध्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा आयोजित केलेला होता.यावेळी अध्यक्षीय भाषणात संस्थापक अध्यक्ष अरुण दादा बारबोले यांनी शालेय मैत्री ही निस्वार्थी असते व तिचा उपयोग आपल्या आयुष्यात एकमेकांच्या मदतीसाठी करावा असे प्रतिपादन केले.
तब्बल 25 वर्षांनतर या बॅच चे स्नेहसंमेलन आयोजित केलेले होते. यावेळी हे विध्यार्थी इतक्या वर्षांनतर एकत्र आलेले होते. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असून देखील सर्वजण स्नेहसंमेलनसाठी एकत्र आले होते.प्रथम छ. शिवाजी महाराज व स्व. अण्णासाहेब बारबोले यांच्या प्रतिमेचे पूजन उपास्थिती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी बऱ्याच जणांना आपले अश्रू अनावर झाले. यावेळी उपस्थित शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विध्यार्थ्यांनी शाळेला 2 व्हाईट बोर्ड भेट म्हणून दिले.
यावेळी प्रमुख उपास्थिती म्हणून मुख्याध्यापक अशोक बारबोले, मुख्याध्यापक बजरंग नरुटे, शिंगण सर, श्रीमती गोरे, श्रीमती ओमन, बारबोले सर, माने सर, माळी सर, पवार, श्रीमती ताटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामेश्वर चौबे तर आभार प्रदर्शन देविदास शिंदे यांनी केले.




