उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 14 जागांवर रिपब्लिकन पक्षाला घवघवीत यश
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई / देहरादून दि.9 : उत्तराखंड राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने घवघवीत यश मिळवित 14 जागांवर विजय मिळविला आहे. उत्तराखंड राज्यातील गाढवाल ; कुमाव या जिल्ह्यातील ग्रामपंचायत ; जिल्हा परिषद ; नगरपरिषद निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने 14 जागांवर विजय मिळविला आहे.गढवाल भागात रिपब्लिकन पक्षाचे 4 ग्राम प्रधान निवडून आले आहेत. कुमाव क्षेत्र येथे 1 ग्राम पंचायत आणि 4 जिल्हा परिषद सदस्य रिपब्लिकन पक्षाचे निवडून आले आहेत. उत्तराखंड च्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपब्लिकन पक्षाला मिळालेला विजय हा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय आहे.आगामी काळात रिपब्लिकन पक्ष उत्तराखंड सहित संपूर्ण उत्तर भारतात विजयी घोडदौड करेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.विधानसभा जिंकण्याचा रस्ता हा स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतील विजयावर अवलंबून असतो.त्यामुळे विधानसभा जिंकून देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या महत्वाच्या आहेत.त्यात रिपब्लिकन पक्षाला मिळालेला विजय हा रिपब्लिकन पक्षाच्या उत्तराखंड मधील पुढील वाटचालीसाठी महत्वाचा आहे असे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.




