वंचित महिलांना शिधापत्रिकांचे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते वितरण

0

एकूण 19 लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने सोलापूर पुरवठा विभागाच्या वतीने समाजातील वंचित घटकांपर्यंत शिधापत्रिकांचा लाभ पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते विधवा, परितक्त्या आणि अनाथ महिलांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित शिधापत्रिका वितरण कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, निरीक्षण अधिकारी प्रफुल्ल नाईक, तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन कांबळे उपस्थित होते. यावेळी एकूण 19 लाभार्थी महिलांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मोनिका सिंग ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “समाजातील प्रत्येक वंचित घटकापर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचविणे हे आमचे कर्तव्य आहे. पुरवठा विभागाने या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले असून, अशा उपक्रमांमुळे प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वास दृढ होतो.” त्यांनी उपस्थितांना पुढील आठवड्यात विशेष बैठक घेऊन अधिक वंचित लाभार्थ्यांची शिफारस करण्याचे आवाहनही केले.

पुरवठा अधिकारी सरडे यांनी सांगितले की, “अप्पर जिल्हाधिकारी यांचा समाजाभिमुख दृष्टिकोन प्रेरणादायी आहे. या उपक्रमात नितीन कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांनी गोरगरीब महिलांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.”

जननायक विचारमंच व शिवशक्ती भीमशक्ती ग्राहक संघाचे प्रतिनिधी नितीन कांबळे यांनीही हा संवेदनशील उपक्रम राबवून विधवा परितक्त्या महिलांना मुख्य प्रवाहात आणले आहे. त्यामुळे असे उपक्रम नियमितपणे होऊन वंचित घटकातील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.

लाभार्थींची नावे :
रेश्मा शेडम, जया चव्हाण, वर्णा वाघमारे, पूजा पेद्दी, प्राजक्ता कांबळे, अंबिका देवकते, गायत्री विटकर, शशिकला देवकरे, अलका मेलगिरी, पूजा चव्हाण, मंगल लोंढे, लानुबाई दुपारगुडे, दिलशाद शेख, तहेरा बक्षी, रेश्मा शेख, शामल रणदिवे, विमलाबाई कांबळे, नौशाद बी. कातनकर, कल्याणी रमेजा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या