महसूल भवनाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात नव्याने उभारण्यात येणाऱ्या महसूल भवनाचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रस्तावित इमारतीच्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. महसूल भवन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत त्यांनी काही आवश्यक सूचना दिल्या. कामाच्या दर्जाबाबत त्यांनी विशेष भर देत, उभारणी दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.




