शेतकऱ्यांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

यवतमाळ, दि. 7 : कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेत फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरीता योगदान देणारे शेतकरी तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, महिलांना पुरस्कार दिले जातात. या विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार राज्यातून १ या पुरस्काराची रक्कम ३ लक्ष, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार विभागातून १ पुरस्काराची रक्कम २ लक्ष, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार विभागातून १ पुरस्काराची रक्कम २ लक्ष, कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार विभागातून १ पुरस्काराची रक्कम २ लक्ष, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार विभागातून १ पुरस्काराची रक्कम १ लक्ष २० हजार, युवा शेतकरी पुरस्कार विभागातून १ पुरस्काराची रक्कम १ लक्ष २० हजार, उद्यानपंडित पुरस्कार विभागातून १ पुरस्काराची रक्कम १ लक्ष, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण व आदिवासी गट) जिल्ह्यातून १ पुरस्काराची रक्कम ४४ हजार अशी आहे.

पुरस्काराचे स्वरुप रक्कमेचा धनादेश स्मृतीचिन्ह, प्रशस्तिपत्र व सपत्नीक, पतीसह सत्कार राहणार आहे. कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

सन २०२४ वर्षामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट संस्थांकडून या विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी सहायक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

जास्तीत जास्त शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांनी विविध कृषि पुरस्कारासाठी परीपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि.२० ऑगस्टपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या